“घडीचा भरवसा नाही, आज आहे उद्या नाही”
माणसाच्या जीवनाविषयी वयस्कर माणसांकडून अनेकदा असे बोलणे आपण ऐकले असेल.कटू असले तरी हे जीवनाचे सत्य आहे कारण मृत्यू हाच विश्वातील सर्वात मोठा आविष्कार आहे.आपल्यापैकी अनेक लोकांवर आपल्या बायको-मुलांची, आई-वडिलांची, भावंडाची जबाबदारी असते.दुर्दैवाने आपला अकस्मात मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबीयांची भयंकर वाताहत होऊ शकते तेव्हा आपल्या पाठीमागे आपले आप्त-स्वकीय व्यवस्थित जीवन जगू शकतील अशी तजवीज करणे आपली जबाबदारी आहे.आपल्यामागे आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्यास आपल्याला मदत होते लाईफ इन्शुरन्सची.लाईफ इन्शुरन्सलाच आपण जीवन विमा असेदेखील म्हणतो.चला तर मग या लेखात माहिती घेऊया लाईफ इन्शुरन्सची.
लाईफ इन्शुरन्स (जीवन विमा) हा पॉलिसीधारक आणि इन्शुरर (विमाकर्ता) यांच्यातील एक करार आहे, जो पॉलिसी होल्डर (विमाधारक) व्यक्तीच्या मृत्यूनंतर नियुक्त लाभार्थीला निर्धारित रक्कम देण्याचे वचन देतो.
उदा. आपण असे समजूया कि मी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचा लाईफ इन्शुरन्स घेतला आहे असे आपण समजूया.
पॉलिसी होल्डर किंवा इन्शुअर्ड : सुरज पठाडे
इन्शुरर किंवा विमाकर्ता : LIC LIFE इन्शुरन्स
प्रति वर्ष प्रीमियम : १०,००० रुपये
इन्शुर्ड सम किंवा विमा रक्कम : १० लाख रुपये
आता दुर्दैवाने माझा इन्शुरन्सने सुरक्षित केलेल्या काळात मृत्यू झाला तर माझ्यामागे माझ्या कुटुंबाला १० लाख रुपये रक्कम मदत म्हणून मिळेल.
मला आशा आहे इन्शुरन्स आता थोडयाफार प्रमाणात तुम्हाला कळाला असेल.
मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स विषयी आपल्यापैकी काही लोकांना माहिती देखील असेल मात्र लाईफ इन्शुरन्सचे देखील विविध प्रकार असतात हे अनेक लोकांना माहित नसेल तेव्हा आता आपण लाईफ इन्शुरन्सचे काही प्रकार बघूया.
या प्लॅनमध्ये टर्म इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध असतेच याशिवाय बचतीचा समावेश असतो. या पॉलिसीमध्ये आपल्याला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर मोठी रक्कम बचतीच्या स्वरूपात उपलब्ध होते.या पॉलिसीमुळे आपल्याला आपण भरलेल्या प्रीमियमची रक्कम बचतीच्या स्वरूपात परत मिळते मात्र या सुविधेमुळे टर्म प्लॅनपेक्षा या पॉलिसीचा प्रिमिअम दोन ते तीन पट अधिक जास्त असतो.एंडोमेंट प्लॅनच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१ च्या अंतर्गत करमुक्त किंवा टॅक्स फ्री असते. म्हणजेच पॉलिसीच्या काळात आपला मृत्यू झाल्यास आपल्या वारसाला ठरलेली रक्कम मिळते तर सुदैवाने आपण पॉलिसीची मुदत पूर्ण करू शकलो तर आपल्याला मोठी रक्कम मिळते.
युलिप्स योजना थोडयाफार प्रमाणात एंडोमेंट प्लॅन सारखीच आहे.एन्डोमेन्टमध्ये आपल्याला सुरक्षा आणि बचत या दोन्ही गोष्टींचा संगम आढळतो तर युलिप्स योजनेत आपल्याला सुरक्षा आणि गुंतवणूक या दोन गोष्टींचे मिश्रण आढळते.युलिप्स योजनेद्वारे आपण आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारी अनुसार शेअर मार्केट, बॉण्ड्स, हायब्रीड फंडस् इ अशा ठिकाणी गुंतवू शकतो.
मनीबॅक इन्शुरन्स प्लॅन हा एंडोमेंट प्लॅन सारखाच एक प्लॅन आहे किंवा एन्डोमेन्ट प्लॅनचाच एक प्रकार आहे असे आपण म्हणू शकतात. “जिंदगी के साथभी जिंदगी के बाद भी” हि ओळ या प्लॅनला अगदी योग्य असल्याचे आपण म्हणू शकतो.या प्लॅनमध्ये आपण इन्शुरन्स प्रिमिअमच्या स्वरूपात जी काही बचत करतो त्या बचतीचा काही हिस्सा आपल्याला बक्षिसाच्या स्वरूपात परत मिळत असतो.मनीबॅक प्लॅनमधून आपल्याला मासिक किंवा वार्षिक परतावा मिळू शकतो आणि म्हणून मग आपल्या उत्पनात थोडीफार वाढ होऊ शकते.मनी बॅक प्लॅन ही जीवन विमा हि अशी एक पॉलिसी आहे ज्या पॉलिसीत विमाधारक व्यक्तीला ठराविक अंतराने विमा रकमेची टक्केवारी मिळते.पॉलिसीद्वारे मिळणारे पैसे हे करमुक्त असतात हा या पॉलिसीचा आणखी एक फायदा होय.
होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन म्हणजे संपूर्ण जीवनासाठी घेतलेली विमा पॉलिसी. संपूर्ण जीवन म्हटले असले तरी हे इन्शुरन्स आपल्याला वयाच्या फक्त ९९ वर्षेच संरक्षण पुरवत असतात. हा प्लॅन अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना असे वाटते कि आपल्यावर उतार वयात देखील म्हणजे ६० वर्षानंतर देखील कुटुंबाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय या पॉलिसीमुळे आपण जाताना आपल्या वारसांसाठी एक मोठी संपत्ती मागे सोडून जाऊ शकतो.
चाईल्ड इन्शुरन्स प्लॅन आपल्याला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी मदत करतात.आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठ्या रक्कमेची गरज पडू शकते अशावेळी या योजना आपल्याला उपयोगी पडतात. मुलांना संरक्षण हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे या योजनेचा प्रिमिअम पालकांनी भरला असल्याने पॉलिसीच्या मुदतीदरम्यान दुर्दैवी घटना घडल्यास आणि विमाधारक पालकांचे निधन झाल्यास, मुलाच्या संगोपन खर्चाची पूर्तता करण्यासाठी चाइल्ड प्लॅन त्वरित पैसे देऊ शकतात.
मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स असणे महत्वाचे आहे हे आपल्या एव्हाना लक्षात आलेच असेल म्हणून मग प्रत्येकाने इन्शुरन्स घ्यायचा का ? नाही. आपल्या सारख्या मध्यमवर्गीय लोकांना घरातील सर्वांचा विमा काढणे परवडणारे नाही शिवाय सर्वांचा विमा काढण्यात काही फायदा देखील दिसत नाही. सर्वसाधारणपणे कुटुंबातील कर्त्या किंवा कमावत्या माणसाचा लाईफ इन्शुरन्स काढलेला असावा असा सल्ला अर्थ तद्द देतात. कुटुंबाची जबाबदारी मुख्यतः कमावत्या पुरुषावर किंवा स्त्रीवर अवलंबून असते हे आपण समजू शकतो. अशावेळी घरातील किमान अशा व्यक्तीचा तरी इन्शुरन्स असल्यास, घरातील कमवता माणूस गेला तरी इन्शुरन्स पॉलिसीमुळे मिळणाऱ्या रक्कमेवर कुटुंब जीवनयापन करू शकेल.